प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

 

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

              अमरावती, दि. 24 : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे प्रशिक्षण सभागृह येथे नुकतच संपन्न झाली. यावेळी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाची माहितीचे सादरीकरण, गट लाभार्थी, सामाईक पायाभूत सुविधा व मार्केटिंग अँड ब्रँडिंग याबाबतची माहिती देण्यात आली.

प्रकल्प संचालक(आत्मा) अर्चना निस्ताने यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी कृषी उपसंचालक उज्वल आगरकर, जिल्हा अग्रणी बँक प्रतिनिधी अतुल करवाडे, नाबार्डचे रहाटे साहेब,  प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचे जिल्हास्तरीय अधिकारी गजानन देशमुख, स्मार्ट प्रकल्पाचे  निलेश राठोड आदी उपस्थित होते.

योजनेअंतर्गत वैयक्तिक, गट लाभार्थी, सामाईक पायाभूत सुविधा व मार्केटिंग अँड ब्रँडिंग याबाबतची माहिती व जिल्ह्याची सद्यस्थिती देण्यात आली.  उपस्थितांना अर्ज दाखल करण्यापासून ते अनुदानापर्यंतची माहिती देण्यात आली. प्रकल्प उभारणी ते जीएसटी नोंदणी प्रक्रियेत सहभाग बाबत मार्गदर्शन देशमुख यांनी केले. सद्यस्थितीत प्राप्त झालेले प्रस्ताव, बँकेकडून मंजूर झालेले प्रस्ताव, बँकेकडून कर्ज वितरण, अनुदान तसेच योजनेचे  औपचारिकीकरण (फॉर्मलायझेशन) यावर विशेष भर देण्यात आला. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, स्मार्ट प्रकल्प, पोकरा मधील  प्रकल्प यांचे कृषी पायाभूत सुविधा मध्ये पात्र असलेल्या प्रकल्पाचे  रुपांतरण (कन्वर्जन) करणे याबाबत माहिती नाबार्डचे श्री रहाटे यांनी दिली. कृषी पायाभूत सुविधा बाबत अर्ज प्रक्रिया ते बँक कडून मंजुरी बाबतची माहिती सादरीकरणव्दारे देण्यात आली. कार्यशाळेस जिल्ह्यातील विविध बँकेचे जिल्हास्तरीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, योजनेचे क्षेत्रीय अधिकारी, जिल्हा संसाधन व्यक्ति तसेच योजने अंतर्गत अर्ज केलेले लाभार्थी, नवीन लाभार्थी, कर्ज प्रकरणे मंजूर असलेले लाभार्थी, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, स्मार्ट प्रकल्प, पोकरा व कृषी विभागाच्या इतर योजनेअंतर्गत दाखल केलेले  पात्र प्रस्ताव  कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत दाखल  करून व्याजावर तीन टक्के सूट  घेऊन लाभार्थ्यांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक(आत्मा) अर्चना निस्ताने यांनी केले. कार्यक्रमाचे शेवटी उपस्थितांकरिता गट लाभार्थी व सामाईक सुविधा केंद्र बाबत उपस्थित प्रश्नांना श्री.देशमुख व श्री. रहाटे यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्मार्ट प्रकल्पाचे अधिकारी निलेश राठोड यांनी केले.

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती