Thursday, August 24, 2023

‘अभिव्यक्ती मताची' स्पर्धेत भरघोस बक्षीसे; वृत्तपत्रविद्या आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे

 

‘अभिव्यक्ती मताची' स्पर्धेत भरघोस बक्षीसे;

वृत्तपत्रविद्या आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे

 

अमरावती, दि. 24 :   विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पना आणि सर्जनशीलतेचा उपयोग मतदार जागृतीसाठी व्हावा या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

स्पर्धेचा कालावधी १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ हा असून या स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नालिजम) महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

स्पर्धेचे विषय याप्रमाणे : युवा वर्ग आणि मताधिकारी, मताधिकारी लोकशाहीचा स्तंभ, एका मताचे सामर्थ्य, सक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका, जबाबदारी, लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि मताधिकारी, या तीनही स्पर्धांचे माध्यम मराठी, हिंदी आणि इंग्रजी राहिल.

             स्पर्धांसाठी आकर्षक बक्षिसे याप्रमाणे : जाहिरात निर्मिती स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 1 लक्ष रूपये, दुसरे पारितोषिक 75 हजार रूपये, तिसरे पारितोषिक 10 हजार रूपये आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी 5 हजार रूपयांची आहेत. घोषवाक्य स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 25 हजार रूपये, दुसरे पारितोषिक 15 हजार रूपये, तिसरे पारितोषिक 10 हजार रूपये आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी 5 हजार रूपयांची आहेत.

           महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयांच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणुक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...