भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात; जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण










 

भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात;

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

            अमरावती, दि. 15 : भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते झाले.

 

‘हर घर तिरंगा’ व 'मेरी मिट्टी , मेरा देश ' या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत उत्साहात सोहळा झाला. प्रारंभी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यावेळी उपस्थितांना तंबाखू व्यसनमुक्तीची शपथ दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटून त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

परिविक्षाधीन अधिकारी नरेश अकुनूरी, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके,  उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले,  रणजित भोसले,  राम लंके, अनिल भटकर, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के, जिल्हा खनिकर्म अधिकारी इब्राहिम शेख, जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के. वानखडे, जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर, तहसिलदार भाग्यश्री देशमुख, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक अमित चेडे, डेविड चव्हाण, अंबादास काकडे, राजू हाते, चक्रधर राहाटे, सनी चव्हाण, सागर काळे आदी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती