Thursday, August 24, 2023

राष्ट्रीय व्हॉलीबॉल संमेलन 2023; दि.28 ते 30 ऑगस्ट दरम्यान स्पर्धेचे आयोजन: 576 खेळाडू होणार सहभागी

 


राष्ट्रीय व्हॉलीबॉल संमेलन 2023;

दि.28 ते 30 ऑगस्ट दरम्यान स्पर्धेचे आयोजन: 576 खेळाडू होणार सहभागी

 

अमरावती दि. 23 : जवाहर नवोदय विद्यालयाव्दारे 31 वा राष्ट्रीय व्हॉलीबॉल संमेलन 2023 चे आयोजन सोमवार दि. 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान विभागीय क्रिडा संकुल, अमरावती येथे होणार आहे. या स्पर्धेमध्ये देशातील आठ विभागातील 576 खेळाडू तसेच 64 इस्कॉर्ट्स सहभागी होणार आहे, अशी माहिती जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य ससिंदरन सी.के. यांनी दिली.

 

            31  राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा अमरावती जिल्ह्यामध्ये प्रथमच होत आहे. या स्पर्धेमध्ये आठ विभागातील म्हणजेच देशातील भोपाल, चंडीगढ, हैदराबाद, जयपूर, लखनऊ, पटना, पुना व शिलांग या विभागातील खेळाडू, एस्कॉर्ट्स व अधिकारी सहभागी होणार आहे. व्हॉलीबॉलच्या सर्व स्पर्धा विभागीय क्रिडा संकुल येथील प्रशस्त कोट्स येथे होणार आहे. स्पर्धेचे सर्व मॅचेस लिग कम नॉकआऊट पद्धतीने होणार  आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आयोजन समितीव्दारे करण्यात आली आहे.

 

            स्पर्धेचे उद्धाटन समारंभ सोमवार दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष जवाहर नवोदय विद्यालयाचे असिस्टंट कमिश्नर व क्लस्टर इंचार्ज पूणे डॉ. ए.एस. सावंत तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित राहणार आहे. तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचे रजिस्ट्रार तुषार देशमुख, विभागीय शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू अनन्या रॉय आदी उपस्थित राहणार आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...