Monday, August 14, 2023

‘माझी माती माझा देश’ या अभियानांतर्गत झेंडा विक्री केंद्राचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे हस्ते शुभारंभ

 




‘माझी माती माझा देश’ या अभियानांतर्गत झेंडा विक्री केंद्राचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे हस्ते शुभारंभ

अमरावती, दि. 14 : महिला आर्थिक विकास महामंडळ वतीने ‘माझी माती माझा देश’ या अभियानांतर्गत एकता अल्पसंख्यांक लोक संचालित साधन केंद्र आणि परिवर्तन लोक संचालित साधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘झेंडा विक्री केंद्र’ लावण्यात आले आहे.  या केंद्राचे शुभारंभ जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी सुनील सोसे, सहायक जिल्हा समन्वयक अधिकारी राम साहू, प्रकाश टाके, अंजूताई गणवीर, प्रीती भैसे, सुरेश चवरे, अंकिता जमखुटे, प्रिया सुळे, लोक संचालित साधन केंद्राचे सदस्य या प्रसंगी उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...