Friday, August 25, 2023

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अनुदान योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

 महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अनुदान योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

अमरावती, दि. 25 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयमार्फत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज/अनुदान योजनेंतर्गत अनुसूचित जाती, नवबौध्द संवर्गातील पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र व इच्छुक लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक एम. ए. अवघाते यांनी केले आहे.

 सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अनुदान, बिजभांडवल, एनएसएफडीसी, व प्रशिक्षण लाभ घेण्यासाठी (लोकशाहीर अण्णाभाऊसाठे विकास महामंडळ व संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाअंतर्गत येणाऱ्या जाती वगळता) ऑनलाईन पध्दतीने अर्ज https://nbrmahapreit.in या पोर्टलवर अर्जदारांनी अर्ज सादर करावा. अर्ज ऑनलाईन करतांना काही अडचणी आल्यास info@mpbcdc.in या ई-मेल वर संपर्क साधावा. अनुसूचित जाती, नवबौध्द संवर्गातील पात्र अर्जदारांनी ऑनलाईन प्राप्त अर्जासह जातीचे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, दरपत्रक तसेच प्रशिक्षण घेवू इच्छिणाऱ्या पात्र व्यक्तींनी शैक्षणिक खंड प्रमाणपत्रासह प्रस्ताव सादर करावा.

0000   

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...