Wednesday, August 9, 2023

क्रांती दिनी जेष्ठ स्वातंत्र सैनिकाचा गौरव

 


क्रांती दिनी जेष्ठ स्वातंत्र सैनिकाचा गौरव

अमरावती, दि. 9 (जिमाका): अमरावती येथील निवासी स्वातंत्र्य संग्राम सैनिक एकनाथ माधवसा हिरुळकर यांचा आज क्रांती दिन 9 ऑगस्ट रोजी प्रशासनामार्फत सत्कार करुन गौरविण्यात आले. महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून प्राप्त अंगवस्त्र, शाल व श्रीफळ देऊन अमरावती उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी श्री. हिरुळकर यांचा सत्कार केला.

भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी दि. 9 ऑगस्ट रोजी मा. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार शासनातर्फे आयोजित करण्यात येतो. परंतु सद्यस्थितीत असे सत्कार समारंभ संबंधित स्वातंत्र्य सैनिकांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अमरावती येथील जेष्ठ स्वातंत्र सैनिक श्री. हिरुळकर यांच्या शंकर नगर येथील निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. नायब तहसीलदार सुनील रासेकर, मंडळ अधिकारी डी .जी.गावनेर, तलाठी एस.आर.भगत यावेळी उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...