‘मेरी मिट्टी मेरा देश’, आणि ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत ‘सद्भावना सायक्लोथॉन’; सायकल रॅलीला मान्यवरांनी दाखविली हिरवी झेंडी: नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

















‘मेरी मिट्टी मेरा देश’, आणि ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत ‘सद्भावना सायक्लोथॉन’;

सायकल रॅलीला मान्यवरांनी दाखविली हिरवी झेंडी: नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

अमरावती, दि. 13 :  पोलीस आयुक्त कार्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त 'सद्भावना सायक्लोथॉन' यासह 'मेरी मिट्टी मेरा देश' (मिट्टी को नमन, वीरो को वंदन), हर घर तिरंगा व 'आजादी का अमृत महोत्सवाच्या समारोपा'निमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस आयुक्त कार्यालयासमोरील मैदान येथून मान्यवरांच्या हस्ते सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी रॅलीत सहभागी झालेले अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

          स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'मेरी मिट्टी मेरा देश ' व 'हर घर तिरंगा उपक्रम ' राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय पर्वात सगळ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन  विभागीय आयुक्त निधी पांडेय व जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले. तसेच रॅलीमध्ये सायकल चालून उपस्थितांचा  उत्साह वाढविला.

        पोलीस आयुक्त कार्यालयासमोरील मैदानापासून आज सकाळी आठ वाजता सायकल रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये जिल्हा प्रशासन व पोलिस आयुक्त कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी तसेच शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सुलभा खोडके, विभागीय आयुक्त निधी पांडेय, पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके आदी उपस्थित होते.

         

 ही रॅली  पोलीस आयुक्त कार्यालयासमोरील मैदानापासून सुरु होवून चपाराशी पुरा, बियाणी चौक, आयुक्त कार्यालय मार्गे वेलकम टी पाईंटपर्यंत गेली. तेथून परत याचमार्गे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मैदानात रॅलीचा समारोप करण्यात आला. या सायकल रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. रॅली मार्गांवरील मुख्य चौकात देशभक्तीपर गीत वाजवून रॅलीचे स्वागत  करण्यात आले. तसेच मार्गावर  जातांना व येतांना 'भारत माता की जय' घोषणाचे  स्वर निनादत होते .त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या समारोपानंतर पोलीस आयुक्त कार्यालयाचे मैदान येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती