शासकीय
तंत्रनिकेतन, अचलपूर येथे 'पंचप्रण शपथ' कार्यक्रम
अशोकचक्र
प्राप्त सेवानिवृत्त सैनिक ज्ञानेश्वर भुजबळ यांचा सत्कार
अमरावती, दि. 11 (जिमाका): ‘मेरी माटी, मेरा देश ’ स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवी सांगता कार्यक्रमांतर्गत शासकीय तंत्रनिकेतन, अचलपूर येथे 'पंचप्रण शपथ'
कार्यक्रम घेण्यात आला . प्र. प्राचार्य अनंत
राऊत यांनी संस्थेतील विभागप्रमुख , अधिव्याख्याते,
कर्मचारी व विद्यार्थ्यांना पंचप्रण शपथ दिली.
यावेळी सेवानिवृत्त
सैनिक 16 मराठा बटालियन अशोक चक्र प्राप्त ज्ञानेश्वर भुजबळ यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ
देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. शरद पांडे यांनी केले.
कार्यक्रमाला संस्थेतील विभागप्रमुख अधिव्याख्याते, कर्मचारी व विद्यार्थी
उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment