Monday, August 14, 2023

राष्ट्रीय लोक अदालत 9 सप्टेंबरला

 राष्ट्रीय लोक अदालत  9 सप्टेंबरला

 

अमरावती, दि.14:  अमरावतीसह जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत शनिवार, दि. 9 सप्टेंबर, रोजी  राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अदालतीत दाखल व दाखलपूर्व अशी प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. नागरिक तसेच पक्षकारांनी  लोकअदालतीसमक्ष आपली प्रकरणे सामंजस्याने  व तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  एम. आर. देशपांडे यांनी केले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या  सूचनेनुसार राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.

नागरिक तसेच पक्षकारांनी तडजोडप्राप्त प्रलंबित खटले  लोकअदालतीसमक्ष तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा. तसेच (दाखलपूर्व) प्रकरणांबाबत नजिकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालयांशी संपर्क साधावा. तरी संबंधितांनी आपली प्रकरणे लोकअदालतीत सामंजस्याने व तडजोडीने मिटवावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी. आर. पाटील  यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...