Friday, August 11, 2023

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन

 

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन

अमरावती, दि. 11 (जिमाका): स्व. मेजर ध्यानचंद यांनी हॉकीमध्ये जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करुन केलेल्या कामगिरीचा गौरव म्हणून त्यांच्या जन्मदिनानिमित्त 29 ऑगस्ट रोजी 'राष्ट्रीय क्रीडादिन' म्हणून साजरा करण्यात येतो.

          क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा कार्यालय, अमरावती विभाग, अमरावती, जिल्हा क्रीडा परिषद  व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय  तसेच शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, एकविध खेळाच्या संघटना तसेच अमरावती महानगर क्रीडा व शारिरिक शिक्षण शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त 29 ऑगस्ट 2023 रोजी साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन विविध खेळ संघटना व मंडळ यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या विविध उपक्रमांचे उद्घाटन विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे  दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता  मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येईल.

              राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रोप स्किपिंग स्पर्धेचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या शाळेतील 6 वी ते 9 वी इयत्तेत शिकत असलेल्या मुले व मुली यांच्यापैकी प्रत्येकी 6 मुले व 6 मुलींच्या नावांची यादी या कार्यालयास  दि. 18 ऑगस्ट 2023 रोजी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे सादर करावी.

          तसेच क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, संस्था तसेच मंडळ यांनी आपल्या स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करावे . त्याबाबतचा अहवाल जिल्हा क्रीडा कार्यालयास कळविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी यांनी केले आहे.

***

 

 

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...