विभागीय आयुक्तांच्या हस्ते ‘इर्विन आरोग्य ज्योत’चे प्रकाशन

 

 










विभागीय आयुक्तांच्या हस्ते
इर्विन आरोग्य ज्योतचे प्रकाशन

उत्तम आरोग्य सेवेत महाराष्ट्र सातत्याने आघाडीवर

-          विभागीय आयुक्त पियुष सिंह

अमरावती, दि. 28 : ‘हेल्थ इंडिकेटरनुसार उत्तम आरोग्य सेवेत महाराष्ट्र राज्य देशात सातत्याने आघाडीवर राहिले आहे. शासकीय आरोग्य सेवेचे त्यात मोठे योगदान आहे. राज्याच्या आरोग्य सेवेने उपचार सुविधांबरोबरच आरोग्य शिक्षणाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज येथे केले.

जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे प्रकाशित इर्विन आरोग्य ज्योतया पुस्तकाचे प्रकाशन विभागीय आयुक्तांच्या हस्ते बचतभवनात झाले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. प्रमोद निरवणे यांच्यासह अनेक वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यावेळी उपस्थित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांच्या निवृत्तीनिमित्त त्यांचा गौरवही मान्यवरांच्या हस्ते यावेळी झाला.

विभागीय आयुक्त श्री. सिंह म्हणाले की, जिल्हा आरोग्य रुग्णालयातर्फे आरोग्य योजना-उपक्रमांची माहिती पुस्तकाद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. अशा उपक्रमात कॉफीटेबल बुक आदींद्वारेही भर घालता येईल. कोविड साथीसारख्या कठीण काळात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी मोलाची सेवा बजावली, असे सांगून श्री. सिंह यांनी डॉ. निकम यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, आरोग्य सेवांची माहिती अत्यंत सुबोध भाषेत या पुस्तकाद्वारे मांडण्यात आली आहे. इर्विनच्या टीमने मेहनत घेऊन महत्वाचे पुस्तक निर्माण केले. हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

डॉ. निकम म्हणाले की, पुस्तकातील माहिती शास्त्रीयदृष्ट्या अचूक व परिपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकाची वाचनीयता वाढविण्यासाठी डॉक्टरांचे विविध अनुभव, कविता आदी साहित्याचाही समावेश केला आहे.

पुस्तकासाठी योगदान देणा-या डॉ. व्ही. के. कुर्तकोटी, यश बुधवाणी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, ॲड. प्रतिमा भाकरे, उज्ज्वला मोहोड, डॉ. ज्योत्स्ना किटकुले, अमर बोडखे आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला. श्री. साखरे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. बोडखे यांनी आभार मानले.

000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती