Thursday, February 24, 2022

महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज सादर करण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

 

महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज सादर

करण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

 

अमरावती दि. 24:-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर सन 2021-22  या शैक्षणिक वर्षासाठी केंद्र पुरस्कृत भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे नवीन अर्ज भरणे व अर्जाचे नुतणीकरण करण्यासाठी आता दिनांक 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दिनांक 28 फेब्रुवारी पर्यंत  https://mahadbtmahait.gov.in  हे पोर्टल विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी सुरू राहणार आहे.

शासनाच्या महाडीबीटी संकेत स्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणीकृत करावे. याबाबत महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सूचना फलक लावून विहीत मुदतीत नोंदणीकृत अर्ज सादर करण्याची कार्यवाही करावी. तसेच पात्र अर्जदारांनी आपले अर्ज नोंदणीकृत करून ऑनलाईन महाविद्यालयांकडे सादर करावेत. तसेच महाविद्यालयांनी ऑनलाईन अर्ज समाजकल्याण विभागाकडे सादर करावेत. शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अंतर्गत येणा-या विविध योजनांचे अर्ज व अर्जाचे नुतणीकरणासाठीचे प्रस्ताव महाविद्यालयांनी दिनांक 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांच्याकडे सादर करावे, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार  यांनी कळविले आहे.

                                                               00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...