विविध क्रीडा प्रबोधिनींमध्ये प्रवेशासाठी चाचणी आयोजन पात्र खेळाडूंना सहभागाचे आवाहन

 

विविध क्रीडा प्रबोधिनींमध्ये प्रवेशासाठी चाचणी आयोजन

पात्र खेळाडूंना सहभागाचे आवाहन

 

अमरावती, दि. 16: शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनींमधील सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेशासाठी विभाग स्तरावर व राज्य स्तरावर चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे. 

जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी विहित नमुन्यातील अर्ज 18 फेब्रुवारीपूर्वी जिल्हा क्रीडा कार्यालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी केले आहे. निरनिराळ्या क्रीडा प्रबोधिनीत निवासी व अनिवासी अशा दोन्ही पद्धतीने प्रवेश दिला जातो. शास्त्रोक्त प्रशिक्षण, अद्ययावत क्रीडा सुविधा, शिक्षण, भोजन, निवास व्यवस्था असते.

मैदानी, आर्चरी, ज्युदो, हँडबॉल, बॅडमिंटन, शूटिंग, कुस्ती, हॉकी, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक आदी खेळनिहाय चाचण्या होतील.

सरळ प्रवेश प्रक्रियेसाठी वय 19 वर्षांखालील राज्य पातळीवरील पदकप्राप्त किंवा राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केलेले खेळाडू पात्र असतील. खेळनिहाय कौशल्य चाचणीसाठी राज्यस्तरावर प्रतिनिधीत्व केलेले 19 वर्षांखालील खेळाडू पात्र असतील. अनिवासी प्रवेश प्रक्रियेत राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम तीन स्थान प्राप्त करणा-या खेळाडूंना प्राधान्याने प्रवेश मिळेल. इतर खेळाडूंची कौशल्य चाचणी होईल. एका प्रबोधिनीत 25 अनिवासी खेळाडूंना प्रवेश मिळतो. विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन श्री. उप्पलवार यांनी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती