वैद्यकीय उपकरणे उत्पादकांनी उत्पादनांची नोंदणी तत्काळ करून घ्यावी - औषधे सहआयुक्त उ. भा. घरोटे

 

वैद्यकीय उपकरणे उत्पादकांनी उत्पादनांची नोंदणी तत्काळ करून घ्यावी

- औषधे सहआयुक्त उ. भा. घरोटे

 

अमरावती, दि. 15 : वैद्यकीय उपकरणे उत्पादकांनी आपल्या उत्पादनांची नोंदणी तत्काळ करून घेण्याचे आवाहन अन्न व औषधे प्रशासनाचे सहआयुक्त (औषधे) उ. भा. घरोटे यांनी केले आहे.

मेडिकल इक्विपमेंटच्या नोंदणीचा उद्देश

सन 2017 पूर्वी अधिसूचित वैद्यकीय उपकरणांवर औषधे व सौंदर्य प्रसाधने नियमांतर्गत नियंत्रण ठेवले जायचे. मात्र, अधिसूचित वैद्यकीय उपकरणांची यादी अत्यल्प होती. सन 2017 मध्ये केंद्र शासनाने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत वैद्यकीय उपकरणे नियम पारित केले. या नियमानुसार रूग्णांच्या उपचारासाठी व रोगनिदानासाठी लागणा-या वेगवेगळ्या उपकरणांचा अंतर्भाव करण्यात आला असून, वर्गवारी करण्यात आली आहे.

वर्गवारीनुसार नियंत्रणाची तरतूद

वैद्यकीय उपकरणांची अ, ब, क व ड अशी वर्गवारी करण्यात आली आहे. त्यातील अ व ब प्रवर्गातील वैद्यकीय उपकरणांवर राज्य शासनाचे नियंत्रण आहे. क व ड प्रवर्गातील उपकरणांवर केंद्र शासनाचे नियंत्रण आहे.

केंद्र शासनाच्या संगणक प्रणालीवर नोंदणी आवश्यक

वैद्यकीय उपकरणांची व्याप्ती व उपलब्धता लक्षात घेता केंद्र शासनाने सुगम पोर्टलवर ऐच्छिक नोंदणी करण्याचे निर्देश दिल. ही नोंदणी 30 सप्टेंबर 2021 पूर्वी करणे अपेक्षित होते. तथापि, त्यानंतर एका वर्षासाठी अर्थात 30 सप्टेंबर 2022 पर्यंत सर्व वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादकांना उपकरणांबाबत केंद्र शासनाच्या संगणक प्रणालीवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

 

 

आताच नोंदणी करणे श्रेयस्कर

उपकरणांच्या नोंदणीसाठी उत्पादकांना वेळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे ती तत्काळ करून घ्यावी. विहित मुदतीत नोंदणी न करणा-या उत्पादकांवर औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा श्री. घरोटे यांनी दिला आहे.

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती