अमरावती विमानतळासाठी आगामी अर्थसंकल्पात होणार १४८ कोटींची तरतूद पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांचा पाठपुरावा

 



अमरावती विमानतळासाठी आगामी अर्थसंकल्पात होणार १४८ कोटींची तरतूद

 

 

पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांचा पाठपुरावा

 

 

मुंबई, दि. २३ : अमरावतीच्या बेलोरा विमानतळासाठी आगामी अर्थसंकल्पात १४८ कोटींची तरतूद होणार आहे. विमाननतळ विस्तारीकरणासाठी १४८ कोटी सुधारीत खर्चाचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडून सामान्य प्रशासन विभागामार्फत नियोजन व वित्त विभागास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आज या सुधारित खर्चास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

 

 

विमानतळ कामाला गती मिळण्यासाठी पुरेसा निधी अर्थसंकल्पित करण्यात यावा यासाठी पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यानुसार आवश्यक निधीला मान्यता देण्यात आली आहे.

 

अमरावती विमानतळाच्या विस्तारीकरणात 2 हजार 600 चौ. मी. क्षेत्रफळाची नवीन टर्मिनल इमारत, नवीन २६ मीटर उंचीचा ए.टी.सी टाँवर व इतर बाबींसह 148 कोटी सुधारित खर्चाचा प्रस्ताव नियोजन व वित्त विभागास सादर करण्यात आला होता. आज मंत्रालयात  पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुधारित निधी अर्थसंकल्पित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 

 

याबाबत बोलताना पालकमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, अमरावती हे प्रादेशिक मुख्यालय असल्याने त्यादृष्टीने सुसज्ज विमानतळ, नाईट लँन्डिंग सुविधा असणे आवश्यक आहे. विमानतळासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही. त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करत आहे. विमानतळामुळे अमरावतीच्या विकासाला, पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

०००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती