Monday, February 28, 2022

जि. प. अध्यक्ष निवासस्थान इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

 






जि. प. अध्यक्ष निवासस्थान इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

 

अमरावती, दि. 28 : येथे जिल्हा परिषद अध्यक्षांचे निवासस्थान इमारतीचे भूमीपूजन महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाले. हे काम गुणवत्तापूर्ण, दर्जेदार व विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

यावेळी आमदार बळवंतराव वानखडे, जि. प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, जि. प. सभापती सुरेश निमकर, बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, पूजा आमले, गिरीश कराळे, जयंतराव देशमुख, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी, कार्यकारी अभियंता विजय वाठ आदी उपस्थित होते.

 

या कामासाठी 2 कोटी 53 लक्ष रुपये प्रशासकीय मान्यता आहे. काम पूर्ण करण्याचा कालावधी चोवीस महिन्यांचा आहे. सुमारे 1 हजार 820 चौ. मी. क्षेत्रफळाचा प्लॉट आहे. तळमजला 549 चौ. मी., तर 424 चौ. मी. पहिल्या मजल्याचे क्षेत्रफळ असेल.

000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...