महाकृषी ऊर्जा अभियान योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्जातील त्रृटी पूर्ण करण्याचे महाऊर्जातर्फे आवाहन

 

महाकृषी ऊर्जा अभियान योजनेंतर्गत

लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्जातील त्रृटी पूर्ण करण्याचे महाऊर्जातर्फे आवाहन

 

अमरावती, दि. 3 (जिमाका): महाकृषी ऊर्जा अभियान (पी.एम.कुसुम योजना घटक-ब) योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे परीपूर्ण एकूण 3 हजार 489 अर्ज आजतागायत ऑनलाईनरित्या महाऊर्जाच्या कुसुम पोर्टलवर प्राप्त झालेले आहेत. या अर्जांपैकी 771 लाभार्थी शेतकऱ्यांनी सौर पंप योजनेचा लाभ घेतलेला आहे. तसेच एकूण 3 हजार 489 लाभार्थी शेतकऱ्यांपैकी 807 लाभार्थी शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये कागदपत्रांची त्रुटी आढळलेली असल्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित यादीमध्ये आहेत. या सर्व लाभार्थ्यांना कुसुम पोर्टलवरुन एसएमएस (SMS) त्यांच्या भ्रमणध्वनीवर पाठविण्यात आलेले आहेत. तसेच महाऊर्जा, विभागीय कार्यालय, अमरावती यांच्याकडून अशा सर्व लाभार्थ्यांना कागदपत्रांची त्रुटी पूर्ण करण्यासाठी भ्रमणध्वनी व पत्राव्दारे कळविण्यात आलेले आहे, तरीही अद्यापपर्यंत काही लाभार्थ्यांकडून त्रुटींची पूर्तता करण्यात आलेली नाही. लाभार्थी शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटींचा तालुकानिहाय तपशिल खालीलप्रमाणे आहे:-

अचलपूर तालुक्यामध्ये त्रुटीतील अर्जाची संख्या (17), अमरावती जिल्ह्यामध्ये त्रुटीतील अर्जाची संख्या (40), अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये त्रुटीतील अर्जाची संख्या (9), भातकुली तालुक्यामध्ये त्रुटीतील अर्जाची संख्या (4), चांदुर रेल्वे तालुक्यामध्ये त्रुटीतील अर्जाची संख्या (14), चांदुर बाजार तालुक्यामध्ये त्रुटीतील अर्जाची संख्या (3), चिखलदरा तालुक्यामध्ये अर्जाची संख्या (395), दर्यापूर तालुक्यामध्ये अर्जाची संख्या (27), धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये अर्जाची संख्या (16), धारणी तालुक्यामध्ये त्रुटीतील अर्जाची संख्या (127), मोर्शी तालुक्यामध्ये त्रुटीतील अर्जाची संख्या (16), नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये त्रुटीतील अर्जाची संख्या (104), तिवसा तालुक्यामध्ये त्रुटीतील अर्जाची संख्या (20), वरूड तालुक्यामध्ये त्रुटीतील अर्जाची संख्या (15)  असे एकुण 807 त्रुटीपूर्ण आहेत. 

या अनुषंगाने सर्व त्रुटीयुक्त अर्ज असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सुचित करण्यात येते की, त्यांनी महाऊर्जा, विभागीय कार्यालय, अमरावती येथे कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0721-2661610 वर संपर्क करुन आपल्या अर्जामध्ये असलेल्या कागदपत्रांच्या त्रुटींबाबत विचारणा करावी. तसेच प्राप्त मार्गदर्शनानुसार त्रुटी पूर्तता करुन घ्यावी. शेतकऱ्यांना मिळालेल्या युजर नेम व पासवर्डचा उपयोग करुन ऑनलाईन पोर्टलवरुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन कागदपत्रांची त्रुटी पूर्तता करावी. यासाठी महाऊर्जाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://kusum.mahaurja.com/benef_home  भेट देण्यात यावी. जे लाभार्थी दि.15 नोव्हेंबर 2023 पर्यंत त्रुटी पूर्तता करणार नाहीत, त्यांचे अर्ज निकाली काढण्यात येतील व मान्यता मिळाल्यास भविष्यात त्यांच्या अर्जाचा क्रम हा ‘प्रथम त्रुटी पूर्तता करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या अनुषंगाने गणला जाईल, याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले आहे. 

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती