दिवाळीनिमित्त फराळ परदेशात पाठविण्यासाठी भारतीय डाक विभागाने घेतला पुढाकार

 


दिवाळीनिमित्त फराळ परदेशात पाठविण्यासाठी

भारतीय डाक विभागाने घेतला पुढाकार


            अमरावती, दि. 8 (जिमाका) : दिवाळी सण म्हटलं की, आनंदोत्सव आणि आप्त नातेवाईकांसोबत फराळाचा आनंद घेणे, ही आपली परंपरा आहे. परंतु नोकरी, शिक्षण व व्यवसाय निमित्त परदेशात राहत असलेल्या भारतीयांची संख्या अधिक आहे. दिवाळी सणासाठी प्रत्येकाला स्वगावी येणे शक्य नसल्याने नातेवाईक परदेशातील आप्त, नातेवाईकांना फराळाचे पदार्थ टपाल सेवेव्दारे पाठवितात. टपाल विभागाचे दर स्वस्त असून सेवा विश्वसनीय आहे. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आनंद वृध्दिंगत करणाऱ्या या सणात घरी तयार केलेला फराळ यूएसए, कॅनडा, यूएई, युके, सिंगापूर आस्ट्रेलिया, रशिया, आयर्लंड व इतर अनेक देशात प्रियजनांना वाजवी दरात पाठविता येणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी जवळच्या डाक घरास संपर्क साधावा, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाक घर डॉ. वसुंधरा अजय गुल्हाने यांनी केले आहे.

 

0000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती