जिल्ह्यातील 2 हजार 172 ग्राहकांनी घेतला भारतीय डाक विभागाच्या 42.67 कोटीचे विमा कवच

 जिल्ह्यातील 2 हजार 172 ग्राहकांनी घेतला भारतीय डाक

विभागाच्या 42.67 कोटीचे विमा कवच

            अमरावती, दि. 8 (जिमाका) : भारतीय डाक विभाग अमरावतीमार्फत  दि. 31 ऑक्टोबर 2023 रोजी ‘डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा महा मेळावा’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नागपुर रिजनचे पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांचे हस्ते करण्यात आले.

          टपाल जीवन विमा हा भारतील सर्वात जुना विमा असून, महिलांना विमा सुरक्षिततेची हमी देणारा भारतातील पहिला विभाग म्हणजे भारतीय डाक विभाग. भारतीय डाक विम्याची सुरवात भारतात 1 फेब्रुवारी 1884 साली झाली आणि आज भारतीय डाक विभाग वेगवेगळ्या विमा योजना राबवित आहे. त्यामध्ये प्रामुख्याने टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा (PLI/RPLI) ह्या दोन योजना आहेत. पूर्वी टपाल विमा योजना ही केवळ शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी, बँक व इतर शासकीय अखत्यारीतील कर्मचारी वर्गासाठी उपलब्ध होती, परंतु शासनाने मागील वर्षापासून पदवी व पदविका धारक नागरिकांना ही सुविधा सुरू केली. त्यामुळे आता जास्तीत-जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. डाक जीवन विमाच वैशिष्ट म्हणजे कमी मासिक हप्ता व जास्त बोनस असा आहे.

               या ग्रामीण डाक जीवन विमा तसेच डाक जीवन विमा महामेळाव्याला शहरी भागातून तसेच ग्रामीण भागातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात डाक विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामीण डाक सेवक यांनी  सहभाग नोंदवत एकाच दिवशी टपाल जीवन विमाचे 27 कोटी 41 लाख 80 हजार रुपये रक्कमेचा व ग्रामीण टपाल जीवन विमा 15 कोटी 21 लाख 69 हजार रक्कमेचा व दोन्ही एकत्रित मिळून 42.67 कोटी रुपयाचा व्यवसाय अमरावती डाक विभागाला मिळवून दिला. या महामेळाव्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील 2 हजार 172 लोकांनी या जीवन विम्याचा लाभ घेतला. तसेच या महामेळाव्यामध्ये डाक विभागाच्या ज्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदविली त्यांना पोस्ट मास्टर जनरल नागपुर रिजन, नागपुर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या महामेळाव्याला अमरावती जिल्ह्यातील 412 ग्रामीण भागातील शाखा डाक, डाक घर व 55 शहरी भागातील डाक घरामधील शाखा डाकपाल आणि उप डाकपाल हजर होते. या महामेळाव्यामधून जवळपास 1 हजार 600 गावातील लोकांना या विमा योजनेचा लाभ मिळाला. या महामेळाव्याचे उपविभागीय स्तरावर नियोजन करण्याची भूमिका अमरावती डाक विभागाचे उपविभागीय अधिकारी एस. बी. निकम, उपअधीक्षक डाक घर अतुल काळे आणि  रविंद्र रोतळे, स्वप्नील पोकळे, प्रभाष कुमार रंजन  यांनी पार पाडली.

        जिल्ह्यातील नागरिकांना जास्तीत डाक जीवन बिमा या योजनेचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी नजीकच्या डाक घराला संपर्क साधावा, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर डॉ. वसुंधरा गुल्हाने केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती