मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी मतदारांना भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 


मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी

मतदारांना भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 

अमरावती, दि. 3 (जिमाका): राज्य निवडणूक आयोगाकडून अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या एकूण 20 सार्वत्रिक तसेच एकूण 50 पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींपैकी ज्या ग्रामपंचायतींमध्ये नामनिर्देशन पत्र अप्राप्त आहे तसेच ज्या ग्रामपंचायती अविरोध झालेल्या आहे अशा ग्रामपंचायती वगळून उर्वरित तालुकानिहाय ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान रविवार, दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे. संबंधित ग्रामपंचायतीमधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी अशा मतदारांना उक्त नमूद केलेल्या मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी तथा विशेष सवलत देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहे. 

या निवडणूकी सर्व पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी रविवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी संबंधित ग्रामपंचायतीच्या निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, निवासी हॉटल्स, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, इतर आस्थापना किंवा निवडणूक होणाऱ्या ज्या ग्रामपंचायतींच्या जगतच्या क्षेत्रात औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) तसेच महानगरपालिकेसारख्या मोठ्या नागरी वसाहती वसलेल्या आहेत, अशा ठिकाणी नोकरीनिमित्त कामास येणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतीमधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी अशा मतदारांना उक्त नमूद केलेल्या मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी तथा विशेष सवलत देण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिली. शहरी भागात किंवा निवडणूका नसलेल्या भागातील दुकाने, कंपन्या, वाणिज्यिक आस्थापना बंद ठेवण्याची आवश्यकता नाही.

अमरावती जिल्ह्यातील तालुकानिहाय प्रत्यक्ष सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींचा तपशील

 

अमरावती जिल्ह्यात चिखलदरा तालुक्यात सोनापूर, टेंब्रुसोंडा, मेहरीआम या ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक आहे. धारणी तालुक्यात बोबदो, जामपाणी, भोंडीलावा येथे तर भातकुली तालुक्यात बैलमारखेडा आणि चांदुरबाजार तालुक्यात मिर्झापूर या ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूका आहेत. मोर्शी तालुक्यात मनिमपूर, गोराळा, रिध्दपूर, ब्राम्हणवाडा थडी येथे तर अचलपूर तालुक्यात पिंपळखुटा, देवगाव आणि निमदरी या ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत. अंजगावसुर्जी तालुक्यात जवळा बु., हयापूर तर चांदूररेल्वे तालुक्यात कारला, पाथरगाव या ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत.

अमरावती जिल्ह्यातील तालुकानिहाय प्रत्यक्ष पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींचा तपशील

            अमरावती जिल्ह्यात अमरावती तालुक्यात पिंप्री चांदुरी, अंजगावबारी तर चांदूररेल्वे तालुक्यात कळमगाव या ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होणार आहेत. अचलपूर तालुक्यात गौरखेडा कुंभी तर वरुड तालुक्यात सुरळी या ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूका होणार आहे. दर्यापूर तालुक्यात लेहेगाव, चंडीकापूर, नायगाव तर धारणी तालुक्यात दाबिदा, मांगीया, दुनी, टेंबली या ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूका होणार आहे. चांदुरबाजार तालुक्यात शिरजगाव बंड येथे तर चिखलदरा तालुक्यात चिचखेडा, चिखली,  बोराळा तसेच धामणगाव रेल्वे तालुक्यातील सोनेगाव खरडा या ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूका होणार आहेत. अशा प्रकारे अमरावती जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूका होणार आहेत, अशी माहिती प्रभारी अधिकारी ग्रामपंचायत निवडणूक तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली आहे.

*****

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती