स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्तता 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी समाज कल्याण विभागाचे आवाहन

 

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्तता 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी

समाज कल्याण विभागाचे आवाहन

 

          अमरावती, दि. 02:  सहायक आयुक्त समाज कल्याण, अमरावती या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत सन 2020-21 व सन 2021-22 या वर्षासाठी सन 2022-23 या वर्षातील अर्ज अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचे अर्ज सादर केलेले आहे.

        या अर्जाची तपासणी व पडताळणी केली असता काही विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये कागदपत्राअभावी त्रुटी आढळून आलेल्या आहेत. तेव्हा असे प्राप्त अर्ज निकाली काढण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती या कार्यालयास सादर केलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्जाची पूर्तता करण्यासाठी या कार्यालयास दि. 10 नोव्हेंबर 2023 दिनांकाच्या आत कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून त्रुटीत असलेल्या अर्जाची पूर्तता करण्यासाठी कार्यालयास संपर्क साधावा. त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे.

        स्वाधार योजनेतील अर्जातील त्रुटी पूर्ण करण्याची अंतिम मुदत दि. 10 नोव्हेंबर 2023 ही असून त्रुटी पूर्ततेची जबाबदारी ही विद्यार्थ्यांची राहील. याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती