Tuesday, November 7, 2023

हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (सौ. सोनु महादेव खंडारे व कु. आराध्या महोदव खंडारे)




 हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन

(सौ. सोनु महादेव खंडारे व कु. आराध्या महोदव खंडारे)

 

अमरावती, दि. 7 (जिमाका) :  येथील सोनु महादेव खंडारे   (वय 30 वर्षे, व तिच्यासोबत तिची मुलगी  कु. आराध्या महोदव खंडारे वय 6 वर्षे,)  हरविल्याची तक्रार खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सौ. सोनु महादेव खंडारे व आराध्या महादेव खंडारे  या दोघीजणी दि. 18 सप्टेंबर, 2023  रोजी दुपारी 1 वाजता घरून बचत गटाचे काम असल्याचे सांगून निघून गेल्या आहेत. नातेवाईंकाकडे शोध घेतला असता सापडल्या नाहीत.  

सौ. सोनु महादेव खंडारे  यांचा वर्ण सावळा, उंची पाच फूट 4 इंच, गोल चेहरा, केस लांब काळे,  डोळे मोठे, चेहऱ्यावर ओठाखाली मोस, उजव्या हाताच्या अंगठ्यावर महादेव, हाताच्या मनगटावर एस.काजल तर डाव्या हाताच्या मनगटावर एम.एस. गोंदलेले आहे. कु. आराध्या महादेव खंडारे, वर्ण गोरा, डोळे मोठे, चेहरा गोल, उंची 3 फुट 5 इंच असे वर्णन आहे.

 उपरोक्त वर्णनाच्या महिला  कुणाला आढळल्यास त्यांनी खोलापुरीगेट पोलीस ठाण्यात (0721)-2678133  या दूरध्वनी क्रमांकावर किंवा संजय लोंदे (मो. क्र.) 8055226211  यावर संपर्क साधण्याचे आवाहन खोलापुरी गेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.. 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...