जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर

 


जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी

होण्याची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर


अमरावती, दि. 8(जिमाका): जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या संस्था, मंडळाने आपले प्रवेश अर्ज दि. 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करावे. युवा महोत्सवामध्ये जास्तीत-जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन

युवा महोत्सवामध्ये यंदा लोकगीत, लोकनृत्य, कथालेखन, फोटोग्राफी, पोस्टर स्पर्धा, वक्‍तृत्व स्पर्धा, संकल्पना आधारित स्पर्धा या युवाकृतींचा समावेश करण्यात येणार आहे. युवा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धेकाचे वय वर्षे 15 ते 29 या दरम्यानचे असावे. स्पर्धक हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. प्रवेश अर्ज सादर करतांना संस्था, मंडळाने स्पर्धकांचे प्रवेश अर्ज, विहित नमुन्यातील ओळखपत्र, आधारकार्ड तसेच जन्मतारखेचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. ओळखपत्र सुस्पष्ट असावे.

       जिल्हास्तरावरील युवा महोत्सवामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड विभागस्तरावर करण्यात येते. तसेच विभागस्तरावर प्राविण्य प्राप्त उमेदवाराची निवड राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी करण्यात येते. यंदाचा राष्ट्रीय युवा महोत्सव 1 ते 10 जानेवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. विहित मुदतीनंतर आलेल्या प्रवेश अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मोर्शी  रोड, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेटावे , असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती