खनिकर्म विभागाच्या ई- निविदा सुचनेस 20 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

 खनिकर्म विभागाच्या ई- निविदा सुचनेस 20 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

        अमरावती, दि. 9 (जिमाका) : अमरावती जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या एकूण 44 रेती, वाळूघाटांचे 14 वाळू डेपोसाठी 14 ई-निविदा पध्दतीने निविदा मागविण्यास आता 20 नोव्हेंबरपर्यंत  मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्यानुसार 14 वाळू डेपोपैकी मौजे जळगाव मंगरुळ ता. धामणगाव रेल्वे, मौजे चांदूर ढोरे ता. तिवसा व मौजे तलई ता. धारणी येथे तीन किंवा त्यापेक्षा जास्त निविदा प्राप्त झालेल्या आहेत. उर्वरित 11 वाळू डेपोसाठी 3 किंवा त्यापेक्षा जास्त निविदा प्राप्त झालेल्या नाहीत. मौजे धामंत्री ता. तिवसा  येथे 3 निविदा प्राप्त झालेल्या असून उर्वरित 10 वाळू डेपोसाठी 3 किंवा त्यापेक्षा जास्त निविदा प्राप्त झालेल्या नाहीत. यासाठी मौजे जळगाव मंगरूळ ता. धामणगाव रेल्वे, मौजे चांदूर ढोरे ता. तिवसा, मौजे तलई ता. धारणी व मौजे धामंत्री ता. तिवसा या वाळूडेपोच्या व्यतिरिक्त इतर 10 वाळू डेपोसाठी ई-निविदेस सोमवार, दि. 20 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रथम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. याबाबत नवीन अर्जदार, निविदा धारकांनी  नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान खा. शेख यांनी केले आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती