Wednesday, November 22, 2023

‘विकसित भारत संकल्प यात्रा’; आजपासून मोहिमेची सुरुवात योजनांची होणार सात व्हॅन्सव्दारे प्रसिद्धी

 

‘विकसित भारत संकल्प यात्रा’; आजपासून मोहिमेची सुरुवात

योजनांची होणार सात व्हॅन्सव्दारे प्रसिद्धी

 अमरावती, दि. 22 (जिमाका):   विविध योजनांमध्ये पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न मिळालेल्या व्यक्तींपर्यंत  केंद्र शासनाच्या योजनांचे लाभ पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिम राबविण्यात येत आहे. यात्रेची सुरुवात जिल्ह्यात गुरुवार दि. 23 नोव्हेंबरपासून होणार असून सर्व विभागाच्या समन्वयाने मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शासनाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत या यात्रेदरम्यान देण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी दिली.

 

             योजनांत पात्र असूनही अद्याप लाभ न मिळालेल्या नागरिकांना लाभ मिळवून देणे, योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे आदी कार्यवाही मोहिमेद्वारे केली जाणार आहे. वंचित समुदायासाठी असलेल्या योजनांच्या जनजागृतीचे ध्येय या विकसित भारत संकल्प यात्रेतून साध्य केले जाणार आहे. ही यात्रा दि. 23 नोव्हेंबरपासून ते दि. 26 जानेवारीपर्यंत विविध ठिकाणी भेट देणार आहे. यात्रेमध्ये योजनाची माहिती, प्रचार व प्रसिद्धीसाठी शासनाकडून सात सुसज्ज व्हॅन्स उपलब्ध होणार आहेत. ही व्हॅन ग्रामपंचायत स्तरावर तसेच नागरी क्षेत्रात निश्चित केलेल्या ठिकाणी भेटी देणार आहे. या यात्रेदरम्यान केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा, उज्ज्वला, मुद्रा, किसान सन्मान, जनधन योजनेसह वनहक्क महसूल विभागाची स्वामित्व योजना, एकलव्य योजना, आयुष्यमान कार्ड तसेच अन्य योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

 

            या यात्रेत भारत सरकारच्या फ्लॅगशीप योजनांचे लाभ लक्षीत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...