सामाजिक न्याय विभागातंर्गत निवासी शाळांच्या फुटबॉल स्पर्धा संपन्न

 


सामाजिक न्याय विभागातंर्गत निवासी

शाळांच्या फुटबॉल स्पर्धा संपन्न

            अमरावती, दि. 9 (जिमाका) : निवासी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये कला क्रीडा इत्यादी गुणांची वाढ व्हावी, यासाठी निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या अमरावती जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळांच्या फुटबॉल स्पर्धा पोलीस मुख्यालयाचे फुटबॉल मैदानावर नुकतीच संपन्न झाली.

या फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार, प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर तसेच पंच श्री. सोलीव व श्री. म्हाला आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जाधव यांनी संबोधित करताना विद्यार्थ्यांनी किमान एका तरी खेळात  प्राविण्य मिळवावे. व त्या माध्यामातून आपले करीअर घडवावे. या फुटबॉल स्पर्धेमध्ये अमरावती जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, तुळजापूर ता. चांदुर रेल्वे, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, सामदा ता. दर्यापूर, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय शाळा, बेनोडा ता. वरूड, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, नांदगाव खंडेश्वर अशा एकूण 4 निवासी शाळांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.

स्पर्धेच्या सुरुवातीला पहिल्या सेमी फायनलमध्ये नाणेफेक करून सामन्यास सुरूवात करण्यात आली. पहिल्या फेरीत निवासी शाळा, तुळजापूर व निवासी शाळा सामदा या दोघांमध्ये सामना होवून त्यामध्ये तुळजापूर शाळेने 1 गोल करून 1-0 ने बाजी मारली. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये निवासी शाळा नांदगाव खंडेश्वर व बेनोडा यांचा सामना अटीतटीचा होवून एकही गोल एकमेंकाविरूध्द करू दिला नाही. पंचांनी दोन्ही संघांना 5 सुपर गोल करण्याची संधी दिली. त्यामध्ये बेनोडा शाळेने 3-0 ने बाजी मारली. त्यानंतर फायनल सामना तुळजापूर निवासी शाळा विरूध्द बेनोडा निवासी शाळा यांच्यामध्ये लढत होवून अंतिम अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, तुळजापूर यांनी 1-0 ने बाजी मारत शाळा विजयी ठरून जिल्हास्तरावर प्रथम स्थान पटकावून विभागीय स्तरावर आपली जागा निश्चित केली. तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, बेनोडाही उपविजेती ठरली.

            बक्षिस वितरण व समारोपीय कार्यक्रमामध्ये पोलीस उपनिरीक्षक शिंदे, सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार, स्पर्धेचे पंच श्री. सोलीव व श्री. म्हाला आदी यावेळी उपस्थित होते. पंचानी आपला निकाल जाहीर करून मान्यवरांचे हस्ते विजेत्या व उपविजेत्या चमूला स्मृतीचिन्ह, पदक व पुष्पगुच्छ देवून गौरविले. या कार्यक्रमास संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, प्रशिक्षक शिक्षक, पंच तसेच सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती