कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी निर्बंध लागू

 

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी निर्बंध लागू

अमरावती, दि. 3 (जिमाका): राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी दिलेल्या पत्रान्वये अमरावती जिल्ह्यातील एकूण 20 सार्वत्रिक व 50 पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीमधील रिक्त झालेल्या पदांसाठी निवडणूकीचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार अमरावती जिल्ह्यातील एकूण 20 सार्वत्रिक व 50 पोटनिवडणूकपैकी एकूण सार्वत्रिक निवडणूक 19 ग्रामपंचायत व पोटनिवडणूक 17 ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात रविवार, दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे.

या पार पडलेल्या सार्वत्रिक व पोटनिवडणूकीची मतमोजणी सोमवार, दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मान्यता दिलेल्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी ठिकाणी व मतमोजणी वेळी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे मतमोजणीच्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यासाठी दक्षता घेण्याच्यादृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यामधील ग्रामपंचायत निवडणूक होणाऱ्या एकूण 20 सार्वत्रिक व 50 पोटनिवडणूकांपैकी प्रत्यक्ष निवडणूक होत असलेल्या सार्वत्रिक निवडणूक एकूण 19 ग्रामपंचायत व पोटनिवडणूक 17 ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी सोमवार, दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजतापासून तर मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत प्रतिबंध असल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी विवेक घोडके यांनी निर्गमित केले आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने उमेदवार किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी आणि मतमोजणी अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही मतमोजणी स्थळाच्या 100 मीटर परीसराच्या आत प्रवेश देण्यात येऊ नये. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना अधिकृत पास दाखविल्याशिवाय प्रवेश देऊ नये. मतमोजणी ठिकाणी कुठल्याही प्रकारचे झेरॉक्स, फॅक्स मशीन, ई-मेल इतर संपर्कसाधनांच्या गैरवापरावर प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच मतमोजणी ठिकाणाच्या 100 मीटर परीसरामध्ये मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्राझीस्टर, कॅलक्यूलेटर इत्यादी प्रकारच्या साधनांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात येत आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व संबंधितावर या कलमानुसार कारवाई करण्यात येईल. हा आदेश मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी सोमवार, दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत लागू राहील, असे अपर जिल्हादंडाधिकारी श्री. घोडके यांनी कळविले आहे.

अमरावती जिल्ह्यातील तालुकानिहाय मतमोजणीचे ठिकाण

            अमरावती तालुक्यात बचत भवन, तहसील कार्यालय, अमरावती, भातकुली तालुक्यात निवडणूक शाखा, जुने तहसील कार्यालय भातकुली, उपविभागीय अधिकारी तिवसा भातकुली इमारत, कॅम्प, अमरावती, चांदूररेल्वे तालुक्यात तहसील कार्यालय, चांदूररेल्वे येथील परिसर, धामणगाव रेल्वे तालुक्यातील तहसील कार्यालय धामणगाव रेल्वे येथील सभागृह, मोर्शी तालुक्यातील तहसील कार्यालय मोर्शी येथील सभागृह, वरुड तालुक्यातील नायब तहसीलदार महसूल यांचे दालन, तहसील कार्यालय, वरुड, दर्यापूर तालुक्यातील तहसील कार्यालय, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तहसील कार्यालय अंजनगाव सुर्जी येथील सभागृह, अचलपूर तालुक्यातील तहसील कार्यालय अचलपूर, चांदुरबाजार तालुक्यातील तहसील कार्यालय, चांदुरबाजार, धारणी तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृह, धारणी तर चिखलदरा तालुक्यातील तहसील कार्यालय चिखलदरा येथील सभागृह येथे मतमोजणी करण्यात येणार आहे.

*****

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती