विश्वकर्मा योजनेतंर्गत ‘मास्टर ट्रेनर’साठी इच्छुकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

विश्वकर्मा योजनेतंर्गत ‘मास्टर ट्रेनरसाठी

इच्छुकांनी नोंदणी करण्याचे आवाहन


            अमरावती, दि. 3 (जिमाका): केंद्र शासनाने देशातील हस्त कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्यामध्ये मेसन्स (मिस्त्री, गवंडी), टेलर (शिंपी), कारपेंटर (सुतार), बारबर्स (न्हावी), ब्लॅकस्मीथ (लोहार), कॉबलर (चर्मकार), पॉटर (कुंभार), वॉशरमन (धोबी), गोल्डस्मिथ (सोनार), हॅमर ॲन्ड टुलकिट मेकर, मालाकार (माळा तयार करणारा), बास्केट मेकर, टोपली तयार करणारा, चटई तयार करणारा, डॉल ॲन्ड टॉय मेकर बाहुल्या व खेळणी तयार करणे, फिशिंग नेट मेकर (मासे पकडण्याचे जाळे बनविणारे), स्कुपटॉर (शिल्पकार, दगड कोरणारे, दगड तोडणारे), आर्मरर (चिलखत बनविणारा), लॉकस्मिथ (कुलपे तयार करणे व दुरूस्ती), बोट मेकर (जहाज, बोट तयार करणारा) अशा एकुण अठरा ट्रेंडसाठी प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनरची आवाश्यकता आहे.

          याबाबत संबंधित ट्रेड मधील माहिती असलेल्या तसेच कमीत-कमी 20 वर्षे अनुभव असलेल्या व्यक्तींनी आपली नोंदणी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये प्रत्यक्ष किंवा भ्रमणध्वनी 9657088116, 7020958231 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. 

00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती