Friday, November 10, 2023

अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतींसाठी नि:शुल्क निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण

 अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतींसाठी

 नि:शुल्क निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण 

अमरावती, दि. 10 (जिमाका): जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांसाठी तसेच नव उद्योजकांसाठी उद्योग संचालनालय, जिल्हा उद्योग केंद्र, अमरावती मैत्री कक्ष उद्योग संचालनालय व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र गाडगेनगर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती विशेष प्रोत्साहन योजनेंतर्गत 18 दिवसीय निःशुल्क निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम मंगळवार, दि. 28 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2023 या कालावधी आयोजित केलेला आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील नवउद्योजकांना तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी उद्योग उभारणीचे प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरू करावा , हा प्रशिक्षणाचा हेतू आहे. 

या प्रशिक्षण दरम्यान प्रशिक्षणामध्ये उद्योजकीय गुण, व्यक्तिमत्व विकास, उद्योगासंबंधात मार्गदर्शन, मार्केटिंग, बँकेची सबसिडी, योजनांची माहिती, उद्योजकीय अडचणीचे निष्कारण, परवाना, उद्योग व्यवस्थापन आदी विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. या प्रशिक्षणासाठी उमेदवार हा 18 ते 50 या वयोगटातील असावा. उमेदवाराची निवड प्रत्यक्ष मुलाखातीव्दारे करण्यात येईल. परिचय मेळावा व मुलाखतीला येतांना मूळ कागदपत्राची छायांकित प्रत, टी. सी., मार्कलिस्ट, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, 3 फोटो सोबत आणावे दि. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 12 ते 3 या दरम्यान या कार्यक्रमाचा एक दिवसीय परिचय मेळावा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पहिला माळा , टांक चेम्बर्स बिल्डिंग , गाडगेनगर , व्ही. एम. व्ही. रोड , अमरावती येथे आयोजित केलेला आहे. तसेच मुलाखती दि. 23 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. भविष्यासाठी प्रशिक्षण संधीचा लाभ होणार असून या कार्यक्रमाची कार्यालयीन वेळेत नोंदणी करावी. व सोबत येतांना शैक्षणिक कागदपत्राची झेरॉक्स व फोटो आधारकार्ड सोबत ठेवावे. नोंदणीची प्रक्रिया 21 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. संपर्कासाठी कार्यक्रम आयोजक  स्वप्नील इसळ , भ्रमणध्वनी क्रमांक 8788604226, प्रकल्प अधिकारी  राजेश सुने  भ्रमणध्वनी क्रमांक 7507747097 तसेच जिल्हा उद्योग केंद्र अमरावती यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पहिला माळा , टांक चेम्बर्स बिल्डींग , गाडगेनगर व्ही. एम. व्ही. रोड ,अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक व विभागीय अधिकारी  प्रदीप इंगळे (भ्रमणध्वनी क्रमांक 9403078769) यांनी केले आहे.

***

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...