Thursday, November 9, 2023

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आनंदाचा शिधा स्थानिक लाभार्थ्यांना वितरीत

 






जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आनंदाचा शिधा स्थानिक लाभार्थ्यांना वितरीत

          अमरावती, दि. 9 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यातील एपीएल शेतकरी, प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी, अंत्योदय योजनेचे लाभार्थी या राशनकार्डधारकांना आनंदाचा शिधा वितरीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार अमरावती शहरातील सरस्वती नगर येथील आशा सुरेश गुप्ता व ए.जी. पुरसवाणी रास्तभाव दुकान येथे प्रभारी जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांच्या हस्ते आनंदाचा शिधा स्थानिक लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आला.

यामध्ये प्रातिनिधीक स्वरुपात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कार्डधारक लाभार्थ्यांना दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के. वानखडे, अन्न धान्‍य वितरण अधिकारी उमेश खोडके, रास्तभाव दुकान मालक सुरेश गुप्ता तसेच नागरिक यावेळी उपस्थित होते.

*****


No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...