मतदान केंद्र परिसरात विशेष सुरक्षा प्रतिबंधीत क्षेत्रात नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई

 

मतदान केंद्र परिसरात विशेष सुरक्षा

प्रतिबंधीत क्षेत्रात नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई

            अमरावती, दि. 3 (जिमाका): राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी दिलेल्या निर्देशानुसार अमरावती जिल्ह्यातील एकूण 20 सार्वत्रिक व 50 पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीमधील रिक्त झालेल्या पदांसाठी निवडणूकीचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार अमरावती जिल्ह्यातील एकूण 20 सार्वत्रिक व 50 पोटनिवडणूकपैकी एकूण 19 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक व 17 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक कार्यक्षेत्रात रविवार, दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. तसेच पार पडलेल्या सार्वत्रिक व पोटनिवडणूकीची मतमोजणी सोमवार, दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मान्यता दिलेल्या ठिकाणी होणार आहे.

            अमरावती जिल्ह्यातील एकूण 20 सार्वत्रिक व 50 पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीमधील रिक्त झालेल्या पदांसाठी प्रत्यक्ष निवडणूक होत असलेल्या एकूण सार्वत्रिक निवडणूक 19 ग्रामपंचायत व पोटनिवडणूक 17 ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी संबंधित क्षेत्रात मतदानाच्या दिवशी रविवार, दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी नमूद करण्यात आलेल्या वेळेत तसेच मतमोजणीच्या दिवशी सोमवार, दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याचे निर्देश अपर जिल्हादंडाधिकारी विवेक घोडके यांनी दिले आहे.

            मतदान हे शांततेत व सुरळी पार पाडण्यासाठी प्रत्यक्षात होत असलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 19 व पोटनिवडणूक 17 ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील मतदान केंद्रावर उद्या शनिवार, दि. 4 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी यांची पथके रवाना करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मतदान रविवार, दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत होणार आहे. निवडणूकीच्या दरम्यान मतदान केंद्रावर व आसपासच्या परिसरामध्ये मतदारांची व नागरिकांची गर्दी होऊन मतदान केंद्राच्या कामकाजामध्ये व्यत्यय निर्माण होऊ नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणूकीची प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणूकीच्या मतदान केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटर परीसरातील सर्व पक्षकारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्सचे उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरीक्त खाजगी वाहन, संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामाव्यतिरीक्त इतर व्यक्तीस प्रवेश प्रतिबंधित करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये लागू करण्यात येणार असल्याची सूचना श्री. घोडके यांनी दिली आहे.

            फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये अमरावती जिल्ह्यामधील ग्रामपंचायत निवडणूक होणाऱ्या एकूण 20 सार्वत्रिक व 50 पोटनिवडणूकीपैकी प्रत्यक्ष निवडणूक होत असलेल्या एकूण 19 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक व पोटनिवडणूक 17 ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामधील सर्व मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरामध्ये शनिवार, दि. 4 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान पथके मतदान केंद्रावर पोहचल्यानंतर ते रविवार, दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत संबंधित क्षेत्र प्रतिबंधित राहणार आहे.

            मतदान पथके मतदान केंद्रावर पोहल्यानंतर मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरामध्ये ध्वनीक्षेपकाच्या वापरावर पूर्णपणे निर्बंध राहतील तसेच मतदान केंद्राच्या 200 मीटर त्रिज्येच्या परिसरात कोणत्याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्ये ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणाऱ्या किंवा जो जसाच्या तसा ऐकविणाऱ्या उपकरण संच लावण्यास, वापरण्यास, चालविण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. या कालावधीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने त्यांचे पक्षाचे मंडप लाऊ नये तसेच मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरामध्ये प्रचार करणे, बेकायदेशीर जमाव करणे, हत्यार बाळगणे, मतदारांना आमीष दाखविणे, मतदार यांना मतदानापासून रोखणे, धुम्रपान करणे, ज्वलनशील पदार्थ नेणे यासाठी प्रतिबंध करण्यात येत आहे. या कालावधीमध्ये अनाधिकृतरित्या मतदार यांची वाहतूक ने-आण करणे, मतदान केंद्रापासून 200 मीटर त्रिज्येच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे वाहन आणने, राजकीय नेत्यांचे फोटो चिन्ह लावणे, घोषणा करणे, जाहिररित्या ओरडणे अथवा मोठ्याने आवाज करणे, मतदान करण्यास उपस्थित मतदाराव्यतिरीक्त जमाव करणे, मनुष्य अथवा प्राणी एकत्रित करणे, झेरॉक्स, फॅक्स, एसटीडी बुथ चालु ठेवणे, हॉटेल्स, पानठेले, खाद्य पदार्थांची दुकाने चालू ठेवणे यावर बंदी राहील.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरीक्त खाजगी वाहन, संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामाव्यतिरीक्त इतर व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी श्री. घोडके यांनी दिली आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती