साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत 30 नोव्हेंबरला मेळाव्याचे आयोजन

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत

30 नोव्हेंबरला मेळाव्याचे आयोजन

 

अमरावती, दि. 21 (जिमाका):   साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महामंडळामार्फत शासनाच्या विविध योजनाची प्रचार व प्रसार व्हावा यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा गुरुवार दि. 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण कार्यालय अमरावती येथे होणार आहे. विविध योजनाची माहिती व लाभ घेण्यासाठी मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक अ.ब. साळुंके यांनी केले.

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनीमादींग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग, गारुडी, मांग गारोडी मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनाचा लाभ समाज बांधवाना व्हावा यासाठी मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे मंडळाचे व्यवस्थापकिय संचालक मनिष सांगळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन  व प्रशिक्षण संस्थाचे महासंचालक सुनिल वारे महाव्यवस्थापक  अनिल मस्के उपस्थित राहणार आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती