अल्पसंख्यांकासाठी काम करणाऱ्या अशासकीय स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज आमंत्रित

 अल्पसंख्यांकासाठी काम करणाऱ्या अशासकीय

स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज आमंत्रित

 

अमरावती, दि. 07 (जिमाका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 15 कलमी कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी आणि स्थानिक अल्पसंख्याकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी अल्पसंख्याक विकास विभाग राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समिती गठित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

            जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीमध्ये अमरावती जिल्ह्यातंर्गत अल्पसंख्याकांसाठी काम करणाऱ्या 3 नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यासाठी जिल्हास्तरावरून अर्ज, प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यासाठी गठीत करण्यात येत असलेल्या जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी इच्छुक असलेल्या नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींनी संस्थेला आयुक्त धर्मदाय किंवा इतर प्राधिकरण यांनी प्रदान केलेले नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचे धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालेली प्रमाणपत्र, संस्थेचे घटना व उद्देश, संस्थेचे मागील तीन वर्षाचे लेखापरिक्षण अहवाल, संबंधित संस्था यांच्या सदस्यांमध्ये कोणतेही न्यायिक वाद नसल्याबाबत 100 रूपयाच्या अर्धन्यायिक कोर्ट फी स्टँपपेपरवर नोटाराईझ प्रमाणपत्र आवश्यक आहे.  संस्थेचे प्रतिनिधी हे अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असणे अनिवार्य आहे.

            वरील अटींची पूर्तता करणाऱ्या नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींनी अमरावती जिल्ह्यासाठी गठित करण्यात येत असलेल्या जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी शुक्रवार, दि. 17 नोव्हेंबर 2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत अल्पसंख्याक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे अर्ज व वरील नमूद सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती