Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Tuesday, November 21, 2023
थेट कर्ज योजना; 30 नोव्हेंबरला चिठ्ठीव्दारे होणार लाभार्थ्यांची निवड
थेट कर्ज योजना; 30 नोव्हेंबरला चिठ्ठीव्दारे होणार लाभार्थ्यांची निवड
अमरावती, दि. 21 (जिमाका): साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आले
होते. त्यानुसार लाभार्थी निवड समितीव्दारे गुरुवार दि. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी
11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, सामाजिक न्याय संकुल अमरावती येथे अर्जदाराची
निवड चिठ्ठयाव्दारे होणार आहे. तरी अर्जदारांनी
बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास
महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.
साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत प्रकल्प मर्यादा एक लाख रुपये थेट योजने
अंतर्गत 26 जून ते 1 ऑगस्ट 2023 या दरम्यान कर्जाची मागणी अर्ज स्विकारण्यात आले होते. या योजने अंतर्गत एकूण 49 कर्ज मागणी अर्जास मान्यता
देण्यात आली आहे. तसेच सन 2022-23 या आर्थिक वर्षातील 97 अर्ज असे एकूण 146 लाभार्थी
निवड समितीने मान्यता दिलेली आहे. त्यामध्ये 115 पुरुष व 31 महिला आहे. मान्यता प्राप्त लाभार्थ्यांपैकी 25 पुरुष व 25
महिला लाभार्थीची निवड चिठ्ठयाव्दारे होणार आहे. निवड झाल्यानंतर वैधानिक दस्तऐवजाची पुर्तता झाल्यानंतर कर्ज वितरण करण्यात येईल. पात्र
अर्जाची यादी महामंडळ कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात आली आहे. याची संबंधितांनी
नोंद घ्यावी.
000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
DIO NEWS AMRAVATI 11-03-2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ; 20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन अमरावती, दि. 11 (जिमाका): राज्...
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
-
पारधी समाजाच्या व्यक्तींसाठी विविध योजना; अर्ज करण्याचे आवाहन अमरावती, दि. 11 : धारणी एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प कार्याक्षेत्रांतर्गत ...
-
खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत अमरावती, दि. 08 (जिमाका) : उद्योजक,...
No comments:
Post a Comment