शासकीय तंत्रनिकेतन येथे युवा मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियान संपन्न

 




 

शासकीय तंत्रनिकेतन येथे युवा मतदार नोंदणी व

मतदार जनजागृती अभियान संपन्न

 

      अमरावती, दि. 2 (जिमाका) : मतदार नोंदणी अधिकारी, 038-अमरावती विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत शासकीय तंत्रनिकेतन स्वायत्त संस्था येथे युवा मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने युवा मतदार नोंदणी करून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी भारत निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून महविद्यालयीन शिबिर राबवून नवमतदारांपर्यत पोहोचून मतदार नोंदणीचे काम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे नियंत्रणात निवडणूक विभागाने सुरू केले आहे.

         शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, शासकीय तंत्रनिकेतन स्वायत्त संस्थेचे प्राचार्य डॉ. विजय मानकर मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

          अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी लोकशाही, निवडणूका व मतदानाचे महत्त्व युवा विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व मतदार नोंदणीचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत प्राचार्य डॉ. विजय मानकर यांनी  विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्याचे अभिवचन यावेळी दिले. यावेळी अंदाजे 800 च्या वर विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणीसाठी नमुना 6 ची उचल केली.

          अभियानाच्या यशस्वीतेसाठी महसूल विभागाचे नायब तहसिलदार सुनिल रासेकर, मंडळ अधिकारी यशवंत चतूर, लिपीक सत्यजित थोरात, भारत कांबळे आदींनी सहकार्य केले. 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती