Wednesday, November 22, 2023

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांचा अमरावती जिल्हा दौरा

 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांचा अमरावती जिल्हा दौरा

 

          अमरावती, दि. 22(जिमाका): राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत(दादा) पाटील हे गुरुवार व शुक्रवार, दि. 23 व 24 नोव्हेंबर 2023 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे:

 

          गुरुवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी रात्री 11.30 वाजता अकोला येथून अमरावती शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम.

 

शुक्रवार दि. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह अमरावती येथून वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय अमरावतीकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता महसूल भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक. दुपार 1 वाजता स्व. डॉ. दिलीप मालखेडे, माजी कुलगुरु यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ : डॉ.के.जी. देशमुख सभागृह, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती.

 

  दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता अमरावती महानगरपालिका कार्यालयास भेट व कामकाज आढावा. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह अमरावती येथे आगमन व राखीव. सायंकाळी 7.10 वाजता शासकीय विश्रामगृह अमरावती येथून वाहनाने कुऱ्हा जि.अमरावतीकडे प्रयाण. सायंकाळी 7.40 वाजता कुऱ्हा स्टँड येथे आगमन व कार्यकर्त्या समवेत संवाद. रात्री 8 वाजता कुऱ्हा स्टँड येथून आर्वी, जि. वर्धाकडे प्रयाण करतील.

00000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...