Monday, November 6, 2023

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत 20 डिसेंबरपर्यंत

 


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी

अर्ज सादर करण्याची मुदत 20 डिसेंबरपर्यंत


        अमरावती, दि. 06 (जिमाका) : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणारी भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2023-24 या वर्षातील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज घेणे सुरू झाले आहे. तरी सर्व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या विद्यार्थ्यांनी दि. 4 नोव्हेंबर 2023 पासून कार्यालयात येवून अर्ज सादर करावे.

       स्वाधार योजनेचे अर्ज घेताना विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे त्या महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफीकेट व मागील वर्षाची गुणपत्रिका कार्यालयात येतांना घेवून यावे. त्यानंतरच विद्यार्थ्यांना अर्ज देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी अर्ज सर्व कागदपत्रांसह सोमवार, दि. 20 डिसेंबर 2023 पर्यंत कार्यालयात सादर करावे, असे आवाहन  सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार यांनी केले आहे.

*****

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...