डॉ. पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन रुरल संस्था येथे युवा मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियान संपन्न

 





डॉ. पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन रुरल संस्था

येथे युवा मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियान संपन्न

 

अमरावती, दि. 2 (जिमाका) : मतदार नोंदणी अधिकारी, 038-अमरावती विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन रुरल संस्थेत युवा मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियानांतर्गत नुकतेच विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने युवा मतदार नोंदणी करुन मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी भारत निवडणुक आयोग प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून महाविद्यालयीन शिबिर राबवून त्यामार्फत नवमतदारांपर्यंत पोहोचून मतदार नोंदणीचे काम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांच्या नियंत्रणात निवडणूक विभागाने सुरू केले आहे.

शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, डॉ. पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन रुरल संस्थेचे प्राचार्य डॉ. गजानन गोसावी, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

          उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. शिंदे यांनी लोकशाही, निवडणूका व मतदानाचे महत्त्व युवा विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व मतदार नोंदणीचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत अंदाजे  700 च्या वर विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणीसाठी नमुना 6 ची उचल केली.

          अभियानाच्या यशस्वीतेसाठी महसूल विभागाचे नायब तहसीलदार सुनील रासेकर, मंडळ अधिकारी यशवंत चतूर, लिपीक सत्यजीत थोरात, भारत कांबळे आदींनी सहकार्य केले. 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती