अटल भुजल योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय माहिती शिक्षण व संवाद कार्यशाळा संपन्न

 अटल भुजल योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय माहिती

शिक्षण व संवाद कार्यशाळा संपन्न


अमरावती, दि, 10 (जिमाका) : अटल भूजल योजनेंतर्गत  नुकतीच  तहसील कार्यालय सभागृह, मोर्शी येथे जिल्हास्तरीय माहिती, शिक्षण व संवाद (IEC) कार्यशाळा संपन्न झाली . या  कार्यशाळेचे आयोजन अटल भूजल योजना तालुकास्तरीय समन्वय समिती मोर्शी व  उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार तसेच अचलपूर उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. 

    अटल भूजल योजनेंतर्गत जिल्हास्तरीय माहिती शिक्षण व संवाद कार्यशाळा ही ग्रामस्थांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच पीक फेर बदल , पाणी बचतीच्या उपाययोजना, गट शेतीची माहिती सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठीचे साधन इत्यादीबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, भूजलमित्र, प्रगतीशील शेतकरी, विंधन विहिरी मालक व तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहित करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.

  वरुड तहसीलदार रविंद्र चव्हाण व मोर्शी तहसीलदार चारुदत्त पाटील, मोर्शी तालुका कृषी अधिकारी श्री. मस्के, वरुड तालुका कृषी अधिकारी श्री. आगरकर, चांदूर बाजार तालुका कृषी अधिकारी श्री. दांडेगावकर, सहायक भूवैज्ञानिक डॉ. केतकी जाधव, कनिष्ठ भूवैज्ञानिक हरिष कठारे, जलसंधारण तज्‍ज्ञ  सचिन चव्हाण व कृषी तज्‍ज्ञ  दिनेश खडसे अमरावतीचे श्री .सारडा ,  मोर्शी, वरुड, चांदूर बाजार तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, प्रगतीशील शेतकरी  यावेळी उपस्थित होते.

कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. केतकी जाधव यांनी  तर संचालन प्रमोद झगेकर यांनी केले. आभार जलसंधारण तज्ज्ञ सचिन चव्हाण यांनी मानले.

  प्रदीपकुमार पवार यांनी संलग्न विभागातील प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत अभिसरणाबाबत चर्चा केली व मागणी-पुरवठा आधारित उपाययोजनाबाबत निधी व कामे याबाबत विभाग प्रमुख यांना मार्गदर्शन केले. अटल भूजल योजनेची सद्यस्थिती 2023 व 2024 या आर्थिक वर्षांच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच तालुकास्तरावर कार्यशाळांचे आयोजन करुन त्यामध्ये ग्रामपंचायतस्तरावरील सरपंच, ग्रामसेवक यांना योजनेची माहिती देण्याबाबत सुचविण्यात आले. 

श्री . उंबरकर यांनी प्रत्येक गावामध्ये अटल भूजल योजनेची जास्तीत-जास्त प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे आहे. लक्षित घटकापर्यंत पोहचण्यासाठी नियोजन करावे ,  ग्रामपंचायतस्तरावर सरपंच, ग्रामसेवक यांना प्रशिक्षणामध्ये सहभागी करुन घेणे गरजेचे असल्याचे सांगितले .  

***

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती