मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आदिवासी युवकांची चित्रकला दिल्ली येथे प्रदर्शित

 








मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आदिवासी युवकांची चित्रकला दिल्ली येथे प्रदर्शित

अमरावती, दि. 07 (जिमाका): मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा देशातील प्रथम नऊ घोषित व्याघ्र प्रकल्पापैकी एक असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा सर्वात मोठा व महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील स्थानिक लोकांसाठी व्याघ्र प्रकल्पाच्या 50 वर्षानिमित्त आदिवासी लोकजीवन, संस्कृती या विषयावर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) व संकला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला मेळघाटातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत विजेते ठरलेले बोराळा येथील विश्वजीत दहीकर व तारुबांदा येथील बलराम कासदेकर यांनी काढलेली चित्रे दिल्ली येथील ‘Silent Conservation: From Margins to the Centre’ या कला प्रदर्शनामध्ये दखल घेण्यात आली. या कला प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या  हस्ते इंडिया हॅबीटेट सेंटर, दिल्ली येथे झाले.

दिल्ली येथे हे प्रदर्शन  नागरिकांसाठी दि. 3 ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधी मध्ये खुले ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आदिवासी कलाकारांना फक्त समर्थन देणे नसून येथे भेट देणाऱ्या लोकांना या आदिवासी कला विकत घेता येऊन वन्यजीव संवर्धनात योगदान देणे हा आहे. विकत घेण्यात आलेल्या चित्रकलेची रक्कम थेट संबंधितांच्या बँके खात्यात जमा करण्यात आली. या प्रदर्शनाचा उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री, पर्यावरण, वन व जलवायू भूपेंद्र यादव तसेच राज्यमंत्री, पर्यावरण, वन व जलवायू अश्विनी कुमार चौबे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती