Friday, November 10, 2023

खाद्य पदार्थ विक्रेते यांची अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी मोहिम

 खाद्य पदार्थ विक्रेते यांची अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी मोहिम

                अमरावती दि.10 (जिमाका) :  सणासुदीच्या काळात अमरावती शहरातील व जिल्हातील किरकोळ व घाऊक खाद्य पदार्थ विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, मिठाई विक्रेते तसेच उत्पादक यांची अन्न व औषध प्रशासन, अमरावती कार्यालयाकडून तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे.

            जनतेस सुरक्षित खाद्य पदार्थ उपलब्ध व्हावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून अमरावती जिल्हयात व अमरावती शहरात अन्न व्यावसायिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. खाद्य तेल, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, रवा, आटा, बेसन, इतर खाद्य पदार्थ यांचे नियमित व सर्वेक्षण अन्न नमुने असे 85 नमुने तपासणीसाठी घेवून  ते शासकीय अन्न प्रयोगशाळेत विश्लेषणास्तव पाठविण्यात आलेले आहे. तपासणीसाठी घेण्यात आलेल्या अन्न पदार्थांच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. 

            जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, मिठाई उत्पादक तसेच विक्रेते यांना जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न पदार्थ तयार करण्याची जागा, साठविण्याची जागा, स्वच्छता, मिठाई तयार करण्याचे टेबल, खाद्यपदार्थ ठेवण्याची भांडी, अन्न पदार्थ वितरित करावयाच्या थाळ्या स्वच्छ ठेवणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना ताजे व सुरक्षित अन्न मिळावे, असे आवाहन सर्व अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा अधिकारी ग.वा.गौर तसेच सहाय्यक आयुक्त अन्न श.म.कोलते यांनी केले आहे. 

            नागरिकांना दुध व दुग्धजन्य पदार्थ वापरुन बनविलेल्या मिठाईंचे सेवन 24 तासाच्या आत करावे . तसेच परवानाधारक अन्न व्यावसायिकांकडून मिठार्ईची खरेदी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) ग.सु. परळीकर यांनी केले आहे. 

***

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...