जिल्हास्तरीय युवा महोत्सव; 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करा

 

जिल्हास्तरीय युवा महोत्सव; 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करा

 

अमरावती, दि. 22 (जिमाका):  क्रीडा व युवक सेवा संचालनालय व अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत सन 2023-24 मध्ये जिल्हास्तरीय युवा महोत्सव व विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सव स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संस्थेने व मंडळाने आपले वैयक्तिक प्रवेश अर्ज बुधवार, दि. 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

 

युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीयस्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.  जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन शुक्रवार, दि. 1 डिंसेबर 2023 रोजी कौशल्य विकास स्पर्धा, युवा कृती स्पर्धा व रांगोळी स्पर्धा तसेच शुक्रवार, दि. 5 डिसेंबर 2023 रोजी सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

          संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिलेली आहे. या संकल्पनेवर आधारित स्पर्धात्मक व अस्पर्धात्मक जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. युवा महोत्सवामध्ये  लोकगीत, लोकनृत्य, कथालेखन, फोटाग्राफी, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संकल्पना आधारीत स्पर्धा, युवाकृती या आठ बाबींचा समावेश करण्यात येणार आहे.

 

युवा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी अटी व शर्ती

 

युवा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धेकाचे वय 15 ते 29 वर्षापर्यंत असावे. (दि.01 एप्रिल 2023), स्पर्धक हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा, प्रवेश अर्ज सादर करताना संस्थेचे तसेच मंडळाचे स्पर्धकांचे प्रवेश अर्ज, विहित नमुन्यातील ओळखपत्र (इंग्रजी मधील), आधारकार्ड व जन्म तारखेचा दाखला असणे आवश्यक आहे. ओळखपत्रावर स्पर्धकाची बाब स्पष्टपणे नमूद असावी. स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासनाव्दारे 1 लक्ष रुपयापर्यंतचे विविध प्रकारचे पारितोषिक देण्यात येणार आहे. जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या युवक-युवती यांची विभागास्तरावर निवड करण्यात येते. व विभागस्तरावर प्राविण्य प्राप्त युवक-युवती यांची निवड राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी करण्यात येते. या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. 1 ते 10 जानेवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

 

जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संस्थेने व मंडळाने आपले वैयक्तिक प्रवेश अर्ज बुधवार, दि. 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे. विहीत मुदतीनंतर आलेल्या प्रवेश अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. अधिक माहिती व नियमावलीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मोर्शी रोड, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेटावे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती तर्फे आयोजित होणाऱ्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये जास्तीत-जास्त युवक-युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारीयांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती