Tuesday, April 9, 2019

लाईव्ह वेबकास्टिंग यंत्रणेने नियंत्रण कक्ष सुसज्ज



अमरावती, दि. 9 :  लोकसभा निवडणुकीत  लाइव्ह वेबकास्टिंगसाठी यंत्रणा नियंत्रण कक्षात सुसज्ज करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी आज नियंत्रण कक्षाला भेट देऊन यंत्रणेची पाहणी केली.
यावेळी श्री. नवाल यांनी कक्षातील तंत्रज्ञांशी चर्चा केली. एकूण मतदान केंद्रांच्या दहा टक्के केंद्रांचा परिसर इलेक्ट्रॉनिक देखरेखीखाली आणण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यंत्रणेद्वारे काटेकोरपणे कार्यवाही व्हावी व वेळोवेळी सर्व विभागांच्या संपर्कात राहण्याबाबत श्री. नवाल यांनी निर्देश दिले.
बुथ परिसरातील सर्व हालचाली निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासह सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून पाहता येणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाशीही ही यंत्रणा जोडण्यात आली आहे.
 सद्य:स्थितीत जिल्ह्यात सुमारे 260 ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.  यंत्रणेकडे सुमारे पावणेतीनशे कॅमेरे उपलब्ध आहेत. आवश्यकता लक्षात घेऊन या संख्येत काही बदल होऊ शकतो, अशी माहिती तंत्रज्ञांनी दिली.
निवडणूकांत गैरप्रकार घडू नयेत, या हेतूने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...