अमरावती, दि. 10 : निवडणूक खर्च निरीक्षक बसंत गढवाल यांनी निवडणुकीसाठी नियुक्त मेळघाट क्षेत्रातील विविध चेकपोस्टला भेट देऊन खर्चाचा आढावा घेतला.
श्री. गढवाल यांनी अचलपूर, चिखलदरा व धारणी येथील चेक पोस्ट व राज्य प्रवेश पॉईंटला भेटी देऊन लेख्याची तपासणी केली. त्यांनी उमेदवारांच्या रोजच्या खर्चाची खातरजमा केली. त्यांनी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, विशेष निरीक्षक पथके, सहा. खर्च निरीक्षक आदींशी चर्चा करून खर्चाचा लेखा नियमित ठेवण्याबाबत निर्देश दिले. या भेटीदरम्यान संपर्क अधिकारी, तहसीलदार व पथकांचे विविध सदस्य उपस्थित होते.
00000


No comments:
Post a Comment