अमरावतीकर, मात करूया कोरोनावरकोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना; जिल्ह्यात पुन्हा सर्वेक्षण आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर - जिल्हाधिकारी शैलेश नवाल



        कोरोना प्रतिबंधासाठी अधिक प्रभावी उपाययोजनांसाठी तपासण्यांचा वेग वाढविण्यात आला आहे. येत्या 13 मेपासून पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात व इतरत्र बाहेरून नागरिक पाहता दक्षता म्हणून पुन्हा सर्वेक्षण करण्यात येईल. त्याचप्रमाणे, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे सांगितले.
        सातत्यपूर्ण सर्वेक्षण, तपासण्या, उपचार, जनजागृती या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्वदूर राबविण्यात येत आहेत. अमरावती विद्यापीठ लॅब येथे स्थापित प्रयोगशाळेत तपासण्यांचा वेग वाढला आहे. दिवसाला 72 चाचण्यांपर्यंत त्यांच्याकडून काम होत आहे. त्यामुळे तपासणी व उपचार यालाही गती मिळून कोरोना प्रतिबंधासाठी त्याचा लाभ होईल. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी नियमितपणे विविध रूग्णालयांना भेटी देऊन आढावा घेतला जात आहे. तेथील यंत्रणा अधिक सक्षम कशी करता येईल, या दृष्टीने प्रयत्न होत असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
           ते पुढे म्हणाले की, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी दक्षतापालन करणे खूप गरजेचे आहे. ही साखळी न तुटल्यास भविष्यात मोठ्या संख्येने रूग्ण वाढण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. त्यामुळे आपले कुटुंब, समाज सुरक्षित करण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांना नागरिकांचे सहकार्य मिळणे खूप आवश्यक आहे.  संयम, स्वनियंत्रणातूनच या साथीवर मात करता येईल. मास्क घातल्याशिवाय बाहेर न पडणे, हातांची स्वच्छता राखणे, नाक व तोंडाला स्पर्श टाळणे, बाहेरून येणा-या वस्तूंची स्वच्छता करणे, गर्दी टाळणे हे उपाय नित्यासाठी अवलंबले पाहिजेत. ते आपल्या सुरक्षित जीवनशैलीचा एक भाग झाला पाहिजेत. त्यामुळे अशी दक्षता पाळून चला अमरावतीकर, मात करूया कोरोनावर हे घोषवाक्य सार्थ ठरविण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.

                        000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती