Friday, May 8, 2020

गरजूंना अन्न पुरविणा-या नानकरोटी उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त

 

          अमरावती, दि. 8 : कोरोना संकटाच्या काळात संचारबंदी लागू असताना शेकडो वंचित, गरीब व गरजूंपर्यंत अन्न पोहोचविणा-या नानक रोटी उपक्रमाला भेट देऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज कृतज्ञता व्यक्त केली.

कोरोना संकटामुळे सर्वत्र संचारबंदी लागू आहे. त्यामुळे अनेक नागरिक जिल्ह्यात अडकून पडले आहेत.  त्याचप्रमाणे, अनेक गरजू, वंचितांचा रोजगार थांबला आहे आणि विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या काळात नानकरोटी उपक्रमाकडून मोठी मदत होत आहे. हातावर पोट असणा-या गोरगरीबांना अन्न पोहचविण्याचे काम नानक रोटी उपक्रमाद्वारे होत आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज उपक्रमाला भेट दिली. उपजिल्हाधिकारी अजय लहाने यावेळी उपस्थित होते.

नानकरोटी ट्रस्टद्वारा 2018 पासून लंगर सेवा सुरू आहे. या उपक्रमात संपूर्ण वर्षभर गरजूंना भोजनदान केले जाते. कुणीही भुकेले राहू नये, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. श्री भाईसाहेब गुरुप्रीत सिंगजी उर्फ रिंकू वीरजी यांच्या प्रेरणेतून अमरावती शहरासह उल्हासनगर, अकोला, वाशिम, ब-हाणपूर, सोलापूर, मुर्तिजापूर, कारंजा लाड, अमळनेर, नांदुरा, जळगाव यासह देशात 57 ठिकाणी नानकरोटी ट्रस्ट सेवा देत आहे. कोरोनाच्या संकटकाळातही ट्रस्टतर्फे शहरात सर्वदूर सेवा देण्यात येत असून, शेकडो गरीब व गरजू बांधवांना त्याचा लाभ होत आहे.

ट्रस्टचे कार्य फार मोठे आहे. संकटाच्या या काळात प्रशासनाला मोठे सहकार्य मिळत आहे. प्रशासनाकडून ट्रस्टला आवश्यक धान्य, साहित्य मिळवून देण्यात येईल, असे सांगून जिल्हाधिका-यांनी ट्रस्टच्या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.  

शंकर ओटवानी, राजकुमार दुर्गई, मोहित भोजवानी, मनोज पुरसवानी, संदीप हासानी, गणेश थावरानी, गुलशन दुर्गई, श्यामलाल पिंजाणी, अजय पिंजाणी, संजय पिंजाणी, इंद्रकुमार लुल्ला, हरीश बजाज, ज्ञानचंद थदानी, रेवाचंद बजाज, मोहनलाल वरंदानी, राहूल दुर्गई, हजारीलाल सेवानी, तरूण दुर्गई, रवी डोलतानी, मोना खत्री, मंदा तायडे आदी उपस्थित होते.

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...