कोरोनाविरोधातील लढ्याला समाजातून मदतीचा ओघ ईसीई एनर्जीकडून मदत

               कोरोना विरोधातील लढ्याला मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. त्यानुसार समाजातून विविध स्तरांतून मदत मिळत असून, जिल्ह्यातून एक कोटींहून अधिक निधी जमा करण्यात आला आहे.
            ईसीई (इंडिया) एनर्जीज प्रा. लि. यांचे व्यवस्थापकीय संचालक अमित आरोकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 51 हजार रूपयांचा धनादेश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे सुपुर्द केला. त्याचप्रमाणे, या संस्थेकडून 1 लाख रूपये प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत कोषात जमा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, 50 हजार रूपये निधीतून स्थानिक पातळीवर गरजूंना वस्तू वाटणा-या स्वयंसेवी संस्थांना मदत देण्यात येत आहे. अशी दोन लाख रूपयांची मदत संस्थेने कोरोनाविरोधातील लढ्याला केल्याचे श्री. आरोकर म्हणाले.
            समाजातून विविध दाते मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यानुसार जिल्ह्यातून अद्यापपर्यंत एक कोटीहून अधिक रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आली आहे.  हे योगदान देणाऱ्या सर्वांचे पालकमंत्र्यांनी आभार मानले आहेत.
            कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून समाजातील अनेक दाते समोर येत आहेत. या संकटकाळात दात्यांचा हा प्रतिसाद त्यांची संवेदनशील वृत्ती दर्शविणारा व  दिलासा देणारा असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. विविध क्षेत्रातील इतरही मान्यवरांनी योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले आहे. 

 
मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19 

 मुख्यमंत्री  सहाय्यता  निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे. खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

 

 Chief Minister’s Relief Fund-COVID 19

 Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300

 

 मराठीत

मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300

 सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती