Thursday, May 14, 2020

मोझरी येथे कोविड रुग्णालय नियमितपणे कार्यान्वित होणार


जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची माहिती

जिल्ह्यात सर्वेक्षणाचा तिसरा टप्पा सुरु;

अमरावतीकर चला मात करुया कोरोनावर मोहिमेला सुरुवात

अमरावती, दि. 14 : देशात व राज्यात सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणू कोविड आजाराच्या रुग्णांवर प्रभावीपणे उपचारपध्दतीचा अवलंब व्हावा, यासाठी मोझरी येथील आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या परिसरात सुमारे 350 खाटांचे सुसज्ज कोविड रुग्णालय कायमस्वरुपी निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिली. कोरोनाचे संकट गेल्यावर सुध्दा हे रुग्णालय इतर विविध आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयोगात येणार आहे.

ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आहेत, त्याठिकाणी तसेच कोविड रुग्णालय स्थापन करण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. याचा भाग म्हणून मोझरी सह अचलपूर येथील ट्रामा केंद्राच्या जागेत तसेच चांदूर बाजारच्या ग्रामीण रुग्णालयात 100 बेडचे कोविड रुग्णालय स्थापित करण्यात येणार आहे. या केंद्रात कोविड आजारासंबंधी सर्व आवश्यक साधनसामुग्री सुसज्ज ठेवण्यात येणार आहे. भविष्यात सुध्दा जिल्ह्यात कोरोना सारखी आपत्तीचे पुनरागमन झाल्यास त्याठिकाणी तत्काळ उपचार होणार आहेत.

काल, दि. 13 मे रोजी आढळून आलेले सायंकाळी पाच व आज (दि.14 मे, रोजी) सकाळी खरकाडीपुरा येथील एक असे सहा पॉझिटिव्ह मिळून जिल्ह्यात आजमितीला 90 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झाली आहे. तसेच आज रोजी ताजनगर येथील डॉक्टर व्यक्तीचा कोरोना पॉझीटिव्ह मुळे मृत्य झाल्याची घटना झाली आहे.  

कोव्‍हीड १९ विषाणूचा प्रादूर्भाव आणि संसर्ग रोखण्‍यासाठी ग्रामिण व शहरी भागात अमरावतीकर-मात करुया करोनावर या मोहीमेचा तिसरा टप्‍पा १३ ते १७ मे या कालावधीत राबविला जात असून शहरी व ग्रामिण भागात करोना दक्षता व सनियंत्रण समिती सदस्‍य व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य पथकांमार्फत प्रत्‍येक कुटूंबाना गृहभेटी देवून ‘सारी’ या आजाराचे, तसेच सर्दी, ताप, खोकला, श्‍वसनास आजार असलेल्‍या व्‍यक्‍तींची नोंद घेवून आरोग्‍य तपासणी केली जाणार आहे. हायरिस्क तसेच कंटेनमेंट झोनसह शहरातील सर्वच क्षेत्रात अधिक दक्षतेने सर्वेक्षण व तपासणी करण्यात येणार असून 70 वर्षावरील व्यक्तींचे रुग्ण शोधून उपचार करण्यात येणार आहे. आरोग्य पथक घरी आल्यावर नागरिकांनी कुठलिही माहिती न लपविता खरोखरची आरोग्य हिस्ट्री सांगावी. आरोग्य पथकांकडून नागरिकांमध्‍ये करोना विषाणू पासून संरक्षण करण्‍यासाठी प्रबोधन, कोरोना विषाणू,कोविड आजाराविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...