अमरावतीतील 7 शासकीय, निमशासकीय संस्थांच्या इमारती अधिग्रहित जिल्हाधिका-यांकडून आदेश जारी

 

अमरावती, दि. 15 : कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना व आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने 7 शासकीय व निमशासकीय संस्थांच्या इमारती अधिग्रहित करण्याचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जारी केला.

विविध आवश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने या इमारती महापालिकेच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. या इमारती व आवश्यक ते साहित्य व या इमारतीचे व्यवस्थापन, व्यवस्थेमध्ये कुठलीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य, कर्मचारी यांची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे. इमारतींच्या व्यवस्थापनाची जबाबदारी महाविद्यालयांचे प्राचार्य व वसतिगृह अधिक्षकांवर सोपविण्यात आली आहे.

त्यानुसार निंभोरा येथील सामाजिक न्यायभवन वसतिगृहाच्या चारही इमारती अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. गोपाळ कळसकर हे संबंधित संस्थेचे प्रमुख असून, मनपातर्फे समन्वय अधिकारी सुमित कांबळे व दीपक खडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूटचे मुलींचे वसतिगृह अधिग्रहित करण्यात आले आहे. संस्थेतर्फे विदा विवेक व मनपातर्फे अमित देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            मोर्शी रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण व शिक्षण संस्थेचे मुलांचे वसतिगृह क्र. 1 व 2, प्रशिक्षणार्थी वसतिगृह व मुलींचे वसतिगृह अधिग्रहित करण्यात आले आहे. संस्थेतर्फे प्राचार्य मंगला देशमुख व मनपातर्फे राहूल दिघडे हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील.

            सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वसतिगृह यासह आणखी एका वसतिगृहाची इमारत अधिग्रहित करण्यात आली आहे. संस्थेतर्फे रमेश इंगोले व मनपातर्फे अभय आकोडे हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील.

            जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मुलांचे, तसेच मुलींचे वसतिगृह अधिग्रहित करून समन्वयासाठी संस्थेचे प्राचार्य व मनपातर्फे कपिल ढाले यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

            विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या अल्पसंख्याक वसतिगृह, मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह या इमारती अधिग्रहित केल्या आहेत. समन्वयाची जबाबदारी संस्थेतर्फे प्रणाली वैद्य व अविनाश रघाताटे यांच्याकडे आहे.

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे मुलींचे वसतिगृह (नवीन) अधिग्रहित करण्यात आले असून, संस्थेतर्फे जयंत काळमेघ, ऋषिराज मेटकर व मनपातर्फे प्रवीण कारंडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

                                    000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती